योगेश यांचे सारे प्रतिसाद पुन्हा एकदा वाचले व या चर्चेचा पुन्हा श्रीगणेशा करावासा वाटला.
सामान्य मानव साधारण खालील प्रमाणे प्राधान्य ठरवतो
मानव (यातही मी, माझे, इतर असा प्राधान्यक्रम आहे तो वेगळा..) याला कारण सारे एकाच प्रजातीचे असणे असावे.
प्राणिजगत.. याला कारण प्राणी माणसाचे काही गुणधर्म दाखवतात...
मातर्उप्रेम, सहकार्य, वैर, सत्तासंघर्ष. या मुळे ते मानवाला जवळचे
वाटत असावेत.
वृक्षवल्ली (ह्या सजीव असून तांत्रिक दृष्ट्या भावनाहीन नसल्या तरी)
मानवासारख्या भावना दर्शवत नसल्याने मानवाला त्याबाबत काहीसा दुरावा
वाटतो.
शेवटी घोडा घाससे दोस्ती करेगा तो खायेगा क्या? (शिवाय हा विचार
देवानेही केलेला दिसत नाही पुरेसा). (त्याला शेपूच्या भाजीपेक्षा फलाहार
कधिही आवडेल, प्रश्न उपलब्धतेचा आहे,
मांसाहराबाबत हही प्रश्न मोठा असावा, निदान दरांवरून तरी तसे वाटते.)
कुणाला खावे, व कुणाला खाऊ नये असे वाटणे, (नैतिक कारणांमुळे) हे मानवाचे
वैशिष्ट्य आहे. जगण्यापुरते खाणे जुळवल्यावरच हा विचार माणूस करू शकतो. नैतिकतेच्या दृष्टीने पाहिले तर गाय वा म्हशीचे दूधही मानवाने
स्वत:साठी वापरणे देखिल अनैतिक आहे, परंतू यात त्यांच्या जीवाला नुकसान न करता
त्यांची योग्य काळजी घेऊन हे सारे करण्याचा मध्यम मार्ग आहे. (जो पाळला जातो अशी भावना आहे.)
बळी तो कान पिळी हा या साऱ्यामागचा मंत्र असून मानव सामर्थ्यवान
असल्याने
तो इतर प्रजातींवर सत्ता गाजवत त्यांचा हवा तसा उपयोग करत आलाच आहे. फक्त
याला कुठेतरी मर्यादा असाव्यात हेच त्याचे वा इतरांचे म्हणणे आहे,
त्यांचा केवळ मौज, चव इत्यादी कारणांसाठी छळ केला जावू नये इतकेच.
वर उल्लेखलेल्या भावांमूळे विचारी माणसाने वनस्पतिंऐवजी प्राण्यांना झुकते माप देणं सहाजिक आहे. (खाण्यासाठी नव्हे!)