चक्रपाणिराव,
अहो असं बघा..... चर्चा पुण्यावर सुरू नाही. तिला पुण्याच्या अभिमानाचे रंग मी दिले नाहीत. पण चर्चा विषय सोडून जातेय म्हणून मी तिला मूळ पदावर आणण्याचा प्रयत्न केला. हलकेच घ्यायच्या गोष्टी तुम्ही गंभीरतेने घेतल्यात. अमेरिकास्थित मुंबईकरांविरुद्ध कोणीतरी आघाडी उघडल्यासारखे तुम्ही एकदम सुतावरून स्वर्गाला गेलात.
वाक्याचे संदर्भ तुम्ही लक्षात घेतलेत तर बरं होईल असं माझं अजूनही मत आहे. मुंबईकरांची कोणी खिल्ली सुद्धा उडवली नाही तर तुम्ही इतक्या अस्तन्या मागे सारल्यात. पुणेकर त्यांची खिल्ली उडवली गेली तर तिची योग्य ती दखल घेतात पण असे वर्दळीवर येत नाहीत, तारतम्याने वागतात. मला वाटतं पुलंचं उदाहरण यासंदर्भात बोलकं आहे. आणि 'शेवटी' याचा अर्थ "final destination" अर्थात वानप्रस्थाश्रम असा होता. पण तो पुलंचा प्रश्न होता. मी त्याबाबत काही बोलू इच्छित नाही. यापुढे आपण माझ्याशी व्य. नि.या तून विषयावर बोलू शकता पण या चर्चेचा मोहरा बदलू नये अशी आपल्याला विनंती आहे.
आपला राग कशाला धरायचा? पण समोरचा काय बोलतो आहे ते आधी जरा शांतपणे पहा तरी ......
आणि तुम्हीही आमच्यावर आणि पुण्यावरसुद्धा राग धरू नये ही विनंती.
--अदिती
ता.क.
माझ्या प्रतिसादातील खालील ओळींकडे आपण का दुर्लक्ष केलेत कळू शकेल काय?
"दहा वर्षांपूर्वीच्या पुण्याची स्थिती ही आजच्या नाशिक ,नागपूर, रत्नागिरी, तळेगाव वगैरे (मला हीच माहिती आहेत म्हणून ही लिहिली आहेत.) शहरांची आजची स्थिती आहे असे कळले म्हणून हा विषय इथे मांडला. या शहरांनी वाट फुटेल तसे वाढू नये तर ज्याला इंग्रजीमधे plaaned township म्हणतात ती अंगिकारावी आणि पुण्या-मुंबईचं अंधानुकरण करण्याऐवजी जे सर्वात हिताचं ठरेल तेच करावं (उदा. उद्याने, टेकड्या, असल्या तर देवराया यांचे संवर्धन, जुन्या आणि औषधी वृक्षांचे संरक्षण आणि जागा मोकळी करणे अपरिहार्य असल्यास पुनर्लागवड, त्यासाठी मोकळ्या राखीव जागा, जाणीवपूर्वक बांधलेले मोठे रस्ते, सांडपाण्याची
चांगली(च) सोय , नदीपात्राचे संरक्षण , चांगली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था इ. गोष्टी )
ऊस गोड लागला म्हणून मुळापासून खाऊ नये म्हणातात. पुण्यात उसाचे मूळ नष्ट होत आहे. त्याला जबाबदार कोणीही असोत (मीही त्यात असेन कदाचित) पण ही गोष्ट सत्य आहे. "