१.या विधानावरून, शाकाहार आणि मांसाहारात "जीवहत्या" हे समान सूत्र आहे, असा तुमच्या म्हणण्याचा अर्थ होत नाही का ? नसल्यास , कृपया तुमची भाषा मला शिकवावी. तसाही भाषा विषयात मी कच्चाच आहे.
शाकाहारातल्या सगळयाच आहारामध्ये जीवहत्या हे सूत्र येत नाही . जसे फ़लाहार किंवा दुग्धाहार ... आणि म्हणूनच मी माझी सगळी चर्चा "शाकाहारावर" केंद्रीत न करता , "वनस्पती/पालेभाज्या" ह्या दोन गोष्टींवर केंद्रीत केली . "वनस्पती /पालेभाज्या आणि मांसाहार" ह्या दोन आहारात जीवहत्या हे समान सूत्र आहे असेच माझे म्हणणे होते आणि आहे ...
२.याच प्रश्नाचे उत्तर शाकाहार आणि मांसाहार यांची तुलना टाळून कसे द्यायचे, हे सांगा. बहुतेकांनी तुमच्या प्रश्नाचे logical उत्तर दिलेले आहे. ते तुम्हाला अपेक्षित नसेल तर इतरांनी तुमच्या illogic प्रमाणे कसे बोलावे ?
वर उल्लेखलेली "त्यां"ची प्रतिक्रीया शाकाहार आणि मांसाहार (योग्य/अयोग्य)ह्याला स्पर्श न करताही "तर्कसंगत" वाटते ..