इथे पुण्याच्या ढासळत्या व्यवस्थे बद्दल मनस्वी तळमळीने लिहिण्याऱ्या लोकांना सविनय प्रणाम,
जोपर्यंत प्रत्येक नागरिक स्वतःला बदलण्याचे मनावर घेत नाही तोपर्यंत पुण्यामध्ये सकारात्मक बदल होणे मला अवघड वाटते. मी स्वतः ट्रॅफ़िक सिग्नल साठी थांबलो असता रस्ता अडवतो म्हणून मार खाल्ला आहे. (रेड लाईट असताना, कौंटर ४५ असताना), बसमधून थुंकू नका सांगितल्या नंतर शिव्या खाल्या आहेत (आई, बाप, घराणे सगळ्याचा उद्धार). तुम्हाला देखील असा अनुभव आला असेल. या सन्केतस्थळावर फ़क्त आपली मते नोन्दवून जास्त फ़रक पडणार नाही. कारण हे फ़क्त मूठभर लोकंच वाचतात. आपण एखादी सन्घटना उभारु शकतो का?