केबलटीवीच्या गच्चीगच्चींवरून फिरणाऱ्या, इमारतींवरून, फ्लॅटांवरून धुडगूस घालणाऱ्या केबलांचा काहीतरी बंदोबस्त त्वरित व्हायला हवी. बघवत नाहीत. या केबला भूमिगत व्हायलाच हव्यात.

कपडे गॅलरीत, गॅलरीतून खाली वाळवणे ही देखील एक अशीच गोष्ट.

पुण्यात वृद्ध लोकसंख्याही खूप वाढते आहे. (या बुजुर्ग मंडळींपैकी अनेक तर एकटेच राहतात आणि मुले अमेरिकेत.)

आता यातील अनेक काका-काकूंना, आजी-आजोंबाना वाहनांच्या तुंबळ वर्दळीत रस्ते ओलांडताना जो त्रास होतो तो कुणाच्याच ध्यानात येत नाही. फिरायला बाहेर पडणे एक मोहीम झाली आहे आणि
पायी फिरण्याची इच्छा असूनही फिरता येत नाही.