आमच्या एका स्नेह्यांनी मांडलेला प्रश्न पुढीलाप्रमाणे -
अगदी च़ढावरही पाच़दहा किलोमीटर इंधनविरहित दुच़ाकी (सायकल) मारायला काही वाटत नाही पण दोन अडच़णी येतात -
१. घामाने वस्त्र अगदी भिज़ून ज़ातात आणि चार लोकांत असे घामेज़लेले बसावयास नको वाटते.
२. शेजारून ज़ाणारी इंधनचलित वाहने प्रचंड धूर सोडतात आणि च़ढावर आपल्याला अधिक हवेची गरज़ असताना तो धूर मी मी म्हणून नाकातोंडात शिरतो.
ह्याबद्दल कोणाज़वळ काही उपाययोजना आहे काय?
आपला
(चौकस) प्रवासी