कपडे गॅलरीत, गॅलरीतून खाली वाळवणे ही देखील एक अशीच गोष्ट.
गॅलरीतले कपडे हा जागतिक 'फेनॉमेनॉ' दिसतो. हैदराबाद, बंगलोर मध्ये सुद्धा हे दिसून आले आहे. इतकेच काय अमेरिकेत सुद्धा उन्हाळ्याच्या दिवसात लोक अंगणात बांधलेल्या दोरीवर कपडे वाळत घालताना पाहिले आहे.
ओले कपडे वाळवण्याची 'चकटफू' सोय असताना, ड्रायर वापरून वीज खर्चणे किती योग्य आहे? तसेच घरांचा आकार पाहता घराच्या आतल्या बाजूला कपडे वाळत घालण्यासाठी असलेली जागा अपुरी पडणे स्वाभाविक आहे. त्यामुळे यात काही गैर आहे असे वाटत नाही.