आपण अकारण वाकड्यात का शिरत आहात?
गुरुत्वाकर्षणाच्या बलाने एखादी वस्तू हलणे आणि जास्तीत जास्त प्रकाश मिळावा म्हणून वनस्पतीने आपली वाढ योग्य त्या दिशेने घडवणे ह्यात आपल्याला फरक दिसत नसेल तर आपल्या मेंदूत आणि आपण उल्लेखलेल्या गंजलेल्या लोहात फार फरक वाटत नाही.
वनस्पती आपल्या पेशी योग्य त्या दिशेने निर्माण करून आपल्या फांद्या मोठ्या करते. प्रकाशाची दिशा पुन्हा पुन्हा बदलली तरी वनस्पतीच्या वाढीच्या बदल दिसतो.
भौतिक वा रासायनिक प्रक्रिया आणि संवेदना ह्यात फरक आहे. वनस्पतीला आपला जीव जगवण्याची, जास्त सूर्यप्रकाश ग्रहण करुन अन्न निर्माण करण्याची, आपली बीजे दूर पसरुन नवी पिढी निर्माण करण्याची, आपले परागकण दुसऱ्या झाडाच्या फुलात आणि दुसऱ्याचे आपल्या फुलात आणण्याकरता आणि जीन पूल समृद्ध करण्याची उपजत ऊर्मी असते. प्राण्यातही ती असते.
आपण लोखंड व अन्य धातूतही ती ऊर्मी असते असे शोधले असल्यास तो शोध नोबेल पारितोषकासाठी अवश्य पाठवा. असा क्रांतिकारी शोध ह्या मानाच्या बक्षिसासाठी सर्वथा पात्र आहे. आणि हो. अर्थातच क्षोभ नसावा!