एकूणएक प्रतिसाद वाचुन माझी पक्की खात्री झाली आहे की इथे सर्वजण केवळ शिळोप्याच्या गप्पा मारायला जमले आहेत. सर्वांना कळकळ जरुर असेल. पण प्रत्येक जण काय करावे ते सांगतो आहे. करताना कोणीच दिसत नाही.
माझे बोलणे काहींना झोंबेलही. पण इलाज नाही, ही वस्तुस्थिती आहे.

मागे खड्ड्यांच्या प्रश्नावर पालिकेलावगैरे शिव्या घालणारे मला बरेच भेटले. पण आपण काहीतरी मार्गाने निषेध व्यक्त करायचा का? असे म्हणताच, काय होणार त्याने... असे म्हणून प्रत्येकाने बोळवण केली. माझ्याही डोक्यात कल्पना बरयाचहोत्या. पण उपयोग शून्य...

एक लक्षात घ्यावे की इथे एकट्या-दुकट्याचा प्रश्न नसल्याने संघटित प्रयत्न आवश्यक आहेत. जोवर तुमचे हे विचार "संघटित"पणे सर्वांसमोर आग्रहाने मांडले जात नाही, त्याच्या अंमलबजावणीकडे काटेकोर लक्ष दिले जात नाही, तोपर्यंत ह्या केवळ बाजारगप्पाच राहतील.

तुमच्यापैकी किती जण यासाठी रस्त्यावर उतरायला तयार आहेत? केवळ चर्चेऐवजी प्रत्यक्ष कृती करायला तयार आहेत? फ़क्त स्वतः नाही तर इतरांनाही करणे भाग पाडायला तयार आहेत? या प्रश्नांवर शासकिय अधिकाऱ्यांशी चर्चा करुन तोडगा काढायला तयार आहेत? शासनावर दबाव निर्माण करायला तयार आहेत? केवळ होकार नको. कार्यवाही हवी.

टेकडी नावाची संघटना पुण्यात आहे असे नुकतेच कळाले. प्रत्यक्ष सहभाग अजून घेतला नसला तरी लवकरच घ्यायची इच्छा आहे.

मनात खूप विचार येतात पण आता मला चर्चेत स्वारस्य नाही. काहीतरी कृती केल्याशिवाय मला शांतता लाभणार नाही.


अति उत्साहाच्या भरात चुकून कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी त्यांची क्षमा मागतो (कृपया परत विषयांतर नको).

तसेच प्रतिसादाचा उद्देश चर्चा हा नसून कृती हा आहे.