आपल्या विचारांशी सामान्यतः सहमत.
मराठी माणूस आरंभशूर आहे असे मला वाटते. त्यामुळे दर वेळेस काहीतरी मुद्दा निघाला की संघटना उभारली जाते. जेंव्हा त्याचे मूळचे सभासद निष्क्रीय होताच ती संघटना लयास जाते. दर वेळेस नवीन संघटना उभारण्यापेक्षा एखाद्या मोठ्या आणि/किंवा प्रस्थापित संघटनेच्या कार्यास हातभार लावला तर जास्ती फायदा होईल असे वाटते.
टेकडी ही संघटना गेली ४-५ वर्षे पर्यावरण विषयी पुण्यात नेटाने काम करते आहे. त्यांच्या कार्यास हातभार लावणे सदर चर्चेच्या हेतूशी संलग्न आहे असे वाटते. पुण्याबाहेर असलेले लोक देणगी देऊन आणि/किंवा प्रचार करून मदत करू शकतात असे वाटते.