एकूण चर्चेवरून मला असा प्रश्न पडला आहे, की प्रत्येक इंग्रजी शब्दाला मराठी प्रतिशब्द हवा आहे का? जिथे आपल्याला योग्य शब्द मिळत नाही (जसे privilege) तिथे इंग्रजी शब्दाला आपण आपल्या भाषेत सामावून घेतले तर काय बिघडणार आहे? तसेही आपण बरेच असे शब्द सामावून घेतले आहेत. तसेच इंग्रजीनेही काही भारतीय शब्द सामावून घेतले आहेत. काही प्रतिशब्द मला तर उच्चारासाठी आणि लिखाणासाठी एवढे कठीण वाटतात की त्यापेक्षा इंग्रजी शब्द सोपा वाटतो त्यामुळे तोच लक्षात राहतो (वरचीच उदाहरणे द्यायची झाली तर, स्वेटर, चिअर्स इ.)

--ध्रुव.