निरंजन क्षीरसागर व भोमेकाका, आपल्या प्रतिसादांमधून 'टेकडी'सारख्या पर्यावरणासाठी काम करणाऱ्या संघटनेबद्दल माहिती मिळाली. पुण्यात वास्तव्य नसल्याने कुठल्याप्रकारे मी त्यांच्या या चांगल्या कार्यात हातभार लावू शकेन, यावर माहिती काढून सहभागी व्हायला उत्सुक आहे. आपण दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. दुवादानाबद्दल भोमेकाकांना धन्यवाद. असेच उपक्रम प्रत्येक ठिकाणी सुरू झाले तर... असा विचार आला मनात..
या चर्चेत चर्चाविषयाशी निगडीत मांडली गेलेली मते ही केवळ काही शहरांपुरतीच मर्यादित नसून अखिल मानववस्तीला लागू आहेत, तरी माझ्यामते आपल्या स्वतःकडून अथवा जवळपासच्या व्यक्तींकडून कुठल्याहीप्रकारे निसर्गाशी, आपल्या संस्कृतीशी उद्दामपणे वागलं जाणार नाही, याची काळजी घेत गेलो तर बहुदा बरेचसे प्रश्न नाहीसे नाही तरी कमी तर नक्कीच होऊ शकतील असे वाटते.
इथे झालेल्या वादांबद्दल काही बोलण्याची माझी इच्छा नाही, पण एक गोष्टीबद्दल खूप खेद वाटला, ती नमूद कराविशी वाटत आहे. दर्जेदार कलाकृतींचा निर्माता/ती असलेल्या कलाकाराविषयी बोलताना चांगल्या म्हणी/वाक्प्रचारांचा वापर केला जावा, असे वाटते. ( संदर्भ : पु.ल.देशपांडे यांच्या मृत्युबद्दल 'गीदडकी मौत..' असे विधान ) कोणाबद्दल कुठल्याही कठोर भावना नाहीत ( No hard feelings ). माझ्या भावना दुखावल्या गेल्या, म्हणून हे विधान. कळावे.