निरंजनराव,
१)हस्तक्षेपाबद्दल मनःपूर्वक आभार. दुर्दैवाने आपला हस्तक्षेप हा हिंदी चित्रपटातल्या पोलिसांसारखा अंमळ उशीरानं झाला. चर्चेची गाडी रुळावर आलेली आहे हे आपल्या लक्षात आले असेलच. पण एक जागरूक वाचक या नात्यानं आपणांस हस्तक्षेप करावासा वाटला हे कौतुकास्पदच आहे.
२)मुद्दा सर्वश्रुत आहे, सगळ्यांना समजलेला आहे. गुद्दा कोणी हाणला हे महत्त्वाचे नाही, तर तो विनाकारण, चर्चेशी विसंगत असूनही हाणला गेला हे माझ्या प्रतिगुद्द्याचे आणि नंतरच्या गुद्दागुद्दीचे कारण आहे, हे मी (तुम्हाला)पहिल्यांदाच आणि (चर्चेत)शेवटचे नमूद करू इच्छितो. गुद्दे निवळून मुद्दा चालू झाला आहे ही आनंदाची बाब आहे. तेव्हा आता येथे कोणताही नवीन गुद्दा हाणण्यापेक्षा चर्चेने मुद्द्याकडे वळावे हीच शुभकामना.
(शुभेच्छुक)चक्रपाणि