अदिती शी पूर्णपणे सहमत.

हा विषय नक्कीच नुसता चर्चेचा नाही. चर्चेतले (किंवा जे चर्चिले गेले नाहीत असेही) काही मुद्दे संघटित होऊन करायचे आहेत तर काही आपले आपण अवलंबायचे आहेत. जसे कालच मला आपल्यातीलच एक  'जे. पी. मॉर्गन' यांचा निरोप आला आहे. त्यांचा निरोप इथे चिकटवत आहे. त्यावरून सर्वांच्या लक्षात येईल की इथल्या चर्चा केवळ शिळोप्याच्या नाहीत आणि लोक कृती करायला ही सिद्ध आहेत.

नमस्कार सुखदा,

पुण्याबद्दलचे तुझे आणि अदितीचे विचार वाचले. खूप छान वाटलं. तू सांगितलेल्या उपायांपैकी खूपश्या गोष्टी वैयक्तिक पातळीवर आणि मित्रांच्यात करतोच, पण तुझा प्रतिसाद वाचून अजून एक गोष्ट केली.

अस्मादिक ऑफ़िस मधे स्वतःचा मग घेऊन गेले. मिरवत मिरवत दर वेळी त्यातून कॉफ़ी पिताना सर्वांना प्लॅस्टिक ग्लास वापरायचं टाळा म्हणून सांगतोय.

दोनच दिवस झालेत, पण माझ्या संघातल्याच दोघांनी पण घरून "मग" आणले. बरं वाटलं.

बदलू. एक दिवस सगळं बदलू!

मनःपूर्वक धन्यवाद!

जे पी.

जे. पी. तुमचे अभिनंदन ! तुमच्यासारखे साथी लाभल्यास तुम्ही म्हणता त्याप्रमाणे खरंच एक दिवस सगळे बदलेल !! आणि आपल्या चर्चेवरून तुम्ही प्रत्यक्ष कृती करून आम्हा सर्वांना निश्चितच प्रोत्साहन दिले आहे. मुद्दाम व्य. नि. वरून प्रतिनिरोप पाठवला नाही.  इथे जाहीर कौतुक आणि आभार व्यक्त करण्यासाठी राखून ठेवला होता !

किल्ल्यांबद्दल बोलायचे झाले तर आपल्यातीलच एक मनोगती 'जी एस' यांना मदत करता येईल. कुठल्यातरी वृत्तांतात वाचले होते की ते नेहमी किल्ल्यांवरचे 'नव साहित्य' नष्ट करण्याचे रसायन बरोबर घेऊन जातात. झालंच तर कचरा साफ करण्याचा प्रयत्न करतात.