अदिती,

४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि भारत जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश बनला. पण आपल्याकडे स्वातंत्र्याचा चुकीचा अर्थ घेतला गेला आहे. स्वातंत्र्याबरोबर जबाबदारीही येते ही जाणीव लोकांना नाही. इथे स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार असा अर्थ घेतल्यानेच, मी काहीही करीन अशी मानसिकता बनलेली आहे. ही समस्या फक्त पुण्याची नसुन अखिल भारताची आहे. माझे घर स्वच्छ ठेवीन पण सार्वजनिक ठिकाणी घाण टाकणे हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे ही किंवा या प्रकारची मानसिकता सर्वत्र आहे. बदल हा निसर्ग नियम आहे. म्हणुनच पायी प्रवास करणारा मनुष्य दुचाकी वापरु लागला आणि कालांतराने स्वयंचलीत दुचाकीने प्रवास करु लागला. जंगले साफ करुन तेथे वस्ती करु लागला ही प्रगती(!) अमेरिका, युरोप व इतर विकसित देशांबरोबर भारतासारख्या विकसनशिल देशांतही झाली. पण मुलभुत फरक इतकाच की त्यांनी प्रगतीबरोबर भविष्यातल्या वाढत्या लोकसंखेबरोबर वाढणाऱ्या मुलभुत, पायाभुत सुविधा, गरजांचाही विचार केलेला होता त्याच बरोबर सामाजीक बांधिलकीही जपली. अमेरिकेत शिकागो मध्ये माझे कार्यालय व निवास ह्यामध्ये फक्त ५ मैलांचे अंतर होते. आणि कार्यालयात जाण्याचा १ मैलाचा रस्ता भर जंगलातुन जात होता. या सारखे अनेक उदाहरणे तिकडे सापडतील. आपल्याकडे अशा प्रकारची मानसिकताही नाही आणि राजकीय इच्छाशक्ती तर नाहीच नाही. राजकारण्यांना फक्त निवड्णुकीच्या ५व्या वर्षात दिसणारे आणि जास्तीत जास्त स्वतःच्या तुंबड्या भरणारे प्रकल्प  करण्यात, उभारण्यात धन्यता असते. कुणी नोकरसम्राटानेच म्हटलयं "सरकारी योजना या फक्त खाण्यासाठीच सुरु केल्या जातात". जो पर्यंत ही मानसिकता बदलत नाही, निसर्गाच्या कारभारात ढवळाढवळ करणे मानव "कमी" करत नाही तो पर्यंत हे असेच चालणार.

 पुण्यात वाढत्या लोकसंख्येला एक प्रमुख व सर्वमान्य कारण म्हणजे रोजगाराच्या संधी. साखर असेल तेथे मुंग्या जमणारच त्यामुळे ही गर्दी वाढतच जाणार यात शंका नाही.

-------------------------------प्रशांत