पुण्याचे सुखद लहानसे -टूमदार- स्वरूप पाहता पाहता नष्ट झाले या खंतेने सर्वश्री आदिती आणि सुखदा यांनी [ज्ञानदेवे रचिला पाया कळस झळके वरि तुकयाचा या चालीवर] मांडलेल्या या चर्चेस अवघ्या ३ दिवसात प्रतिसादांची जी वृष्टी झाली आहे त्यावरून पुण्याबद्दलची कळकळ अतिशय प्रभावी रीतीने व्यक्त झाली आहे.

आता लवकरच प्रशासकांची सूचना येईल की इथली प्रतिसादाची (८५?) मर्यादा आल्यामुळे नविन चर्चा चालू करा.  तेव्हा या चर्चेचे मुद्दे (गुद्दे वगळून) एकत्र आणून पुढील वाटचालीचा आराखडा मांडण्याचे काम कोणी संयोजकाने (किंवा संयोजक चमूने) करावे असे वाटते. 

या कामात (चर्चेत सुसूत्रपणा आणणे आणि त्यातून प्रत्यक्ष कामे करणे) यात मी जितकी होईल तितकी मदत करू शकेन.  अर्थात मी प्रत्यक्ष शरिराने अमेरिकेत असल्यामुळे ही मदत तोंडचीच किंवा महाजालामार्फतच होऊ शकेल.

पुण्याबद्दल वाटणाऱ्या आत्मियतेमुळे या.त सहभागी होण्याची खूप ईच्छा आहे.

काही suggestions -(याला पर्यायी शब्द सूचना किंवा सल्ला हे चपखल बसत नाहीत असे वाटले.  कोणी सुचविले तर बरे वाटेल)

  1. ही चर्चा सर्व पुणेकरांना पूर्ण माहिती होण्यासाठी सकाळ मध्ये तसेच इतर दैनिकांमध्ये प्रसिद्धीस द्यावी. 
  2. ही चर्चा आणि अनुषंगाने ठरवलेले कार्यक्रम फक्त मराठी मधे न करता सर्व भाषिकांना आणि सर्व स्थराच्या समाजाला त्यांत सामावून घ्यावे.  त्यासाठी Times of India, Indian Express वगैरे वर्तमानपत्राचा योग्य वापर करावा.
  3. पुण्यातल्या शिक्षणसंस्था-प्राथमिक, माध्यमिक शाळा आणि महाविद्यालये, विद्यापीठ यांच्या शिक्षक आणि विद्यार्थी वर्गास या मोहिमेत सामील करून घावे.
  4. पुणे, पिंपरी-चिंचवड येथील नगराध्यक्ष, आणि सर्व पक्षांचे नगरपिते यामध्ये येऊ देत.
  5. सर्व राजकीय पक्ष, कामगार चळवळी(unions) यांना एकत्रित काम करण्याचे आवाहन करावे.
  6. पुण्यातील व्यावसायिक, उद्योजक आणि त्यांच्या व्यवस्थापनाला यात सहभागी करावे.  (पैशाची तरतूद ही उद्योजक आणि राजकीय पुढारीच करू शकतील)

हे सर्व चटकन मनात आलेले विचार इथे मांडले आहेत. 

मी स्वतः पहिली २०-२२ वर्षे पुण्यात काढली.  त्यानंतर १५-१६ वर्षे मुंबईमध्ये आणि आता २५ वर्षे परदेशात वास्तव्य आहे. 

या काळात पुण्याला ८३, ९०, ९७, २००० साली प्रत्येकी १-२ आठवड्याकरता भेट दिली. दर वेळेला पुण्यात होत चाललेला बदल प्रकर्षाने जाणवला.  विशेषतः शेवटच्या दोन भेटीमध्ये वातावरण गुदमरून टाकणारा धूर हा सगळ्यात मोठा धक्का होता.  हे वातावरण इतके प्रदूषित होऊ देणे हे criminal आहे असे वाटते.  त्यासाठी सर्व थरातून मोठ्याप्रमाणावर उठाव झाला पाहिजे.

बरे हा प्रतिसाद इथे आवरता घेतो.

(व्यथित माजी पुणेकर) सुभाष

श्री. शशांक - आपण ब्राव्हो बद्दलची चर्चा उध्धरित केल्याबद्दल आपले विशेष आभार.