नाजूक माणसांसाठी (प्रवासी महाशयांचे नाव घेत नाही हो! )

१. कोण म्हणतो वारा आल्यावर मी हालतो,

मी तर ब्रेकडान्स करतो....

२. ये है बेचारा मुसिबत का मारा

इसे चाहिये हमदर्द सिंकारा.....

***

आम्ही आमच्या महाविद्यालयावर फेकलेला हा शेला-पागोटा हाव-भावासह सादर केला होता

आमचे कॉलेज कसे, आमचे कॉलेज कसे,

पंढरपूरचे राऊळ जसे.

आमचे प्राचार्य कसे, आमचे प्राचार्य कसे,

राऊळातले विठोबा जसे.

आमचे अध्यापक कसे, आमचे अध्यापक कसे,

दिंडीत निघाले वारकरी जसे.

आमच्या कॉलेजातल्या मुली कशा,

चंद्रभागेतल्या मासोळ्या जशा.

आमच्या कॉलेजातली मुले कशी,

मासोळ्यावर टपलेली बगळे जशी.....

क्रमशः .....