शहरांचेच कशाला गावांचेही टुमदारपण हरवते आहे. मोठ्या शहरांच्या आसपासच्या
गावखेड्यांत जाऊन आलो की एकेकाळी बरे वाटायचे. आता तसे वाटेलच असे काही
नाही.
काही दिवसांपूर्वी बऱ्याच दिवसांनी आळंदीला गेलो होतो. मंदिर
परिसराता आणि आसपास भरपूर मोकळ्या जागा हव्यात. पण भक्तीच्या बाजारात
जिथेतिथे फुटकळ विक्रेत्यांची गर्दी आणि नवी बांधकामे. कसलेही नियोजन
नाही, नियंत्रण नाही.
जाता-जाता, अमृतसरच्या सुवर्ण मंदिरालगतच्या परिसराचे जसे
निर्गर्दीकरण(decongestion) करण्यात आले आहे तसेच आळंदीलाही व्हावे, असे
वाटते.