अनिकेतराव,
जो काही निर्णय घ्यायचा तो विचार करून घ्यावा आणि घेतलेल्या निर्णयाबद्दल पश्चाताप करू नये ! हे लिहायला सोपे असले तरी आचरणात आणायला फारच कठिण आहे , हे मान्य आहे. परंतू, आयुष्या नेहमी चांगल्या गोष्टी पहाण्यास शिकले की "बोच" कमी होत जाते. स्वतःच्या निर्णयावर ठाम असा,, त्यातून मिळणारे फायदे शोधा इतरांच्या आयुष्याशी तुलना करु नका. दोन वेगवेगळी आयुष्ये कधीच सारखी नसतात.
(अनिकेतजी, हा प्रतिसाद देण्याचे कारण इतकेच की, काही लोकांनी "आकस" "द्वेष" वगैरे मुद्दे आणले. ते चुकीचे आहेत. नाहीतर कोणाच्या व्यक्तिगत आयुष्यातील गोष्टींवर भाष्य करण्याचे, सल्ले देण्याचे मी टाळतो.
माझा सल्ला मित्रत्वाचा आहे. वय, पेशा आणि केसांचा रंग यांना अनुसरुन नाही. मागच्या गोष्टीतून धडा घ्यायचा की द्वेष-आकस यांच्या नादी लागायचे तुम्हीच ठरवा ! )
कदाचित विषयाला सोडून असेल, परंतू, रोज प्राणायाम आणि योगासने केलीत तर मनःशांती आणि उत्तम आरोग्य लाभेल. प्रयत्न करुन पहा. प्राणायाम आणि योगासनांचा परिणाम दिसायला कमीत कमी ३ महिने लागतील, तेवढा संयम ठेवल्यास फायदा निश्चित आहे.