आज दिवसभर प्रतिसाद द्यायला धडपडतोय.... भ्रमणप्रणाली सादेला प्रतिसाद देत नव्हती. शेवटी ऊर्ध्वीकरण केल्यावर प्रश्न सुटला (आता पक्का 'मनोगती' झालो ना?).
तर सांगायची गोष्ट अशी की १२०० वाचने आणि ८२ प्रतिसाद बरंच काही सांगून जातात. पण अदिती, सुखदा, चित्त, प्रशांत,धृव, भाष आदिंनी लिहील्याप्रमाणे काहीतरी करूया. आपण सगळेच मनोगती विचारी, कल्पक आणि मुख्य म्हणजे कळकळ असणारे आहोत. तेव्हा आपली कळकळ चित्रपटलावर न राहाता (कागदावर कसे म्हणणार?) कृतीत आणू शकलो तर झकासच! आधी आपण आपल्यात भेटून छोट्या प्रमाणात काहीतरी करता येईल. पण आपण सगळेच ह्या बाबतीत खूप काही योगदान देऊ शकू असं वाटतं.
माधव कुलकर्णी, भोमेकाका, चक्रपाणि, जी एस, यांसारख्यांनी मार्गदर्शन करावे.
बाकी माझ्या "बारश्या"ची नावं सुचवल्याबद्दल धन्यवाद! "संभाजी विडी" कसे वाटते?