देशपांडेमामा, छानच आहे 'पोळी फ्राय'.

पोळी शिळी असण्यामागे 'पोळीतल्या ओलेपणाचा अभाव' असे अपेक्षित आहे, असे वाटते. पोळी मुद्दाम सुकवल्यासही हा प्रकार करता येऊ शकतो. नुकत्याच केलेल्या पोळीचाही हा प्रकार करू शकतो, परंतु त्यात तेल जास्त शोषून घेतले जात असल्याने सामान्यतः असे कोणी करत नाही.

घडीच्या पोळीसोबतच हा प्रकार फुलके, पराठे या प्रकारांवरही अमलात आणून आगळा आनंद अनुभवू शकतो.

पोळ्या नीट साधल्या नाही ( अर्धकच्च्या राहिल्या अथवा फुगल्या नाही ) तर त्या वेळी त्या पोळ्या तशाच सुकवून त्यांचा वरील 'पोळी फ्राय' करावा. खमंग चविष्ट लागतो.

मोनॅको टॉपिंग्समध्ये मोनॅको बिस्किटांचा करतात त्याप्रमाणे या पोळीफ्रायचा उपयोग करून खाद्यपदार्थात रंगत आणू शकतो.