देशपांडेमामा, लेख काढून टाकायची सुविधा आता या लेखापुरती तरी आपल्याला उपलब्ध नाही, अगदीच हवे असल्यास कदाचित 'प्रशासक' आपणांस मदत करू शकतील ( नक्की माहित नाही ). हा लेख काढून टाकायची मलातरी काही गरज वाटत नाही. तुम्ही तुमचा आवडता पदार्थ सर्वांना करून खाता यावा म्हणून ही पाककृती लिहिलीत यात काहीच वावगं नाही, तेच अपेक्षित आहे खरं तर ! सुखदाने 'तुम्ही केलंत ते चूक आहे' असं दर्शवून देण्यासाठी दुवा दिलेला नसून मनोगतवर आधी झालेल्या लिखाणाकडेही तुम्ही एक नजर टाकावीत, असे सुचवण्याच्या हेतूने दिलेला असावा. तुम्ही अशाच प्रकारे छान पाककृती लिहित जा. मनोगतवर वावरण्याबाबत काही मदत हवी असल्यास जरूर सांगणे.