जो निर्णय राजने घ्यायचा आहे, तो त्याने त्याची बायको, आई-वडिल यांच्याबरोबर विचार विनिमय करून घ्यावा. आपल्या निर्णयाचा आपल्या कुटुंबावरही परिणाम होणार आहे याची जाणीव ठेवून करावा. आणि एकदा निर्णय घेतला की त्याच्या परिणामांची जबाबदारी स्वीकारण्यासही तयार असावे. विपरित परिणाम झाल्यास बायकोला किंवा आई-वडिलांना 'तू/तुम्ही म्हणालात म्हणून असे केले' असा दोष देऊ नये. जर यश स्वीकारण्याची तयारी असेल तर अपयश स्वीकारण्याची तयारीही ठेवावी.

--ध्रुव.