अनिकेत महोदय, तुम्ही परदेशात जाण्याच्या संधीचा उल्लेख केला आहे म्हणून लिहितो. स्वानुभवावरून सांगतो, परदेशात जाण्याची संधी मिळत असताना ती खरोखरच 'संधी' आहे का याचा विचार करावा. बऱ्याच वेळा अशी 'illusions' आपल्या समोर येतात. अमेरिका किंवा परदेशगमन हे अशाच प्रकारचे एक 'illusion' आहे. त्यामुळे केंव्हा ती खरोखरच संधी आहे याचा विचार करणे राजसाठी फार महत्त्वाचे आहे. अशा वेळेस राजच्या करिअरच्या दृष्टीने ती गोष्ट महत्वाची असेलही, पण आपल्या बायकोच्या करिअरचाही त्याने त्यावेळेस विचार करावा.
कुटुंब ही माझ्या मते सर्वात महत्वाची गोष्ट आहे. करिअर आणि पैसा नंतर येतात. पैसा मिळवणे ही तेवढी कठीण गोष्ट नाही. त्याचा योग्य विनिमय करता आला पाहिजे. पैसे मिळवण्याचे हजार मार्ग समोर असतात, अगदी कायदेशीररीत्या मोठ्या प्रमाणावर पैसा मिळवता येतो आणि तो देखील जास्तीत जास्त वेळ कुटुंबाबरोबर घालवून! त्यामुळे वर म्हणाल्याप्रमाणे राज जर त्याच्या आयुष्यातील संधी ओळखू शकला, तर या तीनही गोष्टी साध्य करणं सोपे जाईल.
--ध्रुव.