नको वाटेल इतका आग्रह हा भारतात् फार होतो. अमेरिकेत अमका माणूस अमकी गोष्ट खात नाही वा पीत नाही असे कळले तर ते शांतपणे स्वीकारतात.

मी दारु पीत नाही पण भारतात जेव्हा मित्रांबरोबर पबमधे जायचो तेव्हा ते नको इतका आग्रह करायचे नाराज व्हायचे. इथे तसे होत नाही. कोक वा अन्य साधे पेय घेऊन त्या गटात सामिल होता येते. 
  आग्रहाची मर्यादा असावी असे मलाही वाटते.
 अर्थात शाकाहारी लोकांचा आम्ही हत्या करत नाही म्हणून आम्ही मांसाहाऱ्यांपेक्षा श्रेष्ठ हे ठीक आहे का हा वादाचा मुख्य मुद्दा आहे. असो.