'सकाळ'ची लेख गायब करण्याची सवय पाहता हा प्रतिसाद इथे लिहून ठेवावासा वाटला.

सदर बातमीनुसार-

"मारूती गाडीचे सुटे इंजिन आणि इतर सुटे भाग स्थानिकरीत्या मिळवून विद्युत जनित्र बांधण्यात आले आहे. हे जनित्र गोबरगॅसवर चालवण्यात येते."

===

सदरहू शेतकऱ्यांकडे बहुसंख्य गायी आहेत का म्हशी हे जाणून घेणे सुद्धा या चर्चेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे असे वाटते.

बातमीनुसार त्यांच्याकडे १२५ म्हशी आहेत. बातमीत गायींचा उल्लेख नाही.