उर्जेचे स्रोत म्हणून गाईला देव मानायचे? काहीतरी काय? उद्या कुणी मानवी विष्ठेचे असेच उपयोग करु लागला तर समस्त माणसांना देव आणि त्यांच्या ह्या "उत्पादना"ला प्रसाद मानाल का?
जगातील ६०-७० टक्के तेल अरबस्तानात आहे म्हणून अरबस्तानाला देवस्थान मानाल का? का डायनॅसोरसना देव मानायचे ज्यांच्यापासून हे तेल बनल्याचे मानले जाते?
लाकडे, कोळसे, दगडी कोळसे, गॅस हे सगळी उर्जास्रोत आहेत. युरेनियम व प्लुटोनियमही आहेत. मग काय हे सगळे देवघरात घालून पूजायचे की काय? कशासाठी?
त्यांचा जास्त अभ्यास करून जास्त प्रभावी उपयोग करणे जास्त योग्य का देवघरात ठेवणे?