परदेशगमन किंवा आपल्याच देशात वेगळ्या राज्यात जाऊन काही काळ निवास करणे, याचा आपल्या नोकरीतील प्रगतीच्या दृष्टीने संधी म्हणून विचार करण्याबरोबरच नवीन अनुभव घ्यायची संधी म्हणूनही पाहता येईल असे मला वाटते. दुर्लभ असा मनुष्यजन्म मिळाल्यावर त्यात शक्य तेवढे अनुभव घ्यावेत, नव्या वाटा धुंडाळाव्यात, घराची ऊब सोडून काही कडू - काही गोड अनुभव घ्यावेत. मार्क ट्वेनचे एक वाक्य असे आहे - " आजपासून २० वर्षांनी तुम्हांला तुम्ही केलेल्या गोष्टींच्या आनंदापेक्षा राहून गेलेल्या गोष्टींचे दुःख अधिक होईल. तेव्हा सुरक्षित बंदरापासून तुमची नाव दूर न्या. शिडांत वेगळे वारे संचारू द्या. Explore. Dream. Discover."

घरापासून प्रथमच दूर राहताना होणारी घालमेल मी अनुभवली आहे, पण त्याचबरोबर एका वेगळ्या संस्कृतीशी परिचय होत असताना, नवनवीन ठिकाणे पाहताना येणारी मजा, मिळणारा आनंद वेगळाच. 

असो, या प्रश्नाला सगळ्या परिस्थितीत मान्य होणारे एकच उत्तर नसावे असे वाटते. आयुष्यातील श्रेयस आणि प्रेयस मधील निवाडा बहुधा व्यक्तिसापेक्ष असतो.

नंदन