मला असा (दुर-)आग्रह खरोखरच पटत नाही , माझ्यामते प्रत्येक व्यक्ती ही स्वतंत्रच आहे आणि एखाद्या व्यक्तीने काय खाव आणि काय खाऊ नये हे ठरवणारं दुसरे कुणीच नाहीत .

हो ,पण पावलोपावली अशी माणसं भेटतात हे सत्य आहे आणि माझ्याही ती मस्तकात जातात ....

....पण शेवटी काय जर आग्रहाचा जर दुराग्रह झाला तर सरळ बचावात्मक पण थोडा आक्रमक पवित्रा घेण माझ्या मते गरजेचं आहे . म्हणजे मी जर तुमच्या जागी असतो तर ," तुम्ही काही बोललात तरी मला हे नाहीच खायचयं ,काय  म्हणणं आहे तुमचं ..." अशा प्रकारची भूमिका घेतली असती. अतिरेकी लोकांना त्यांच्याच भाषेत समजावावं ,उगाच गप्प  राहून स्वतःला त्रास घेऊ नये अशा मताचा मी आहे ... मग समोरचा माणूस त्या वेळेपुरता नाराज झाला तरी हरकत नाही ,पण निदान पुन्हा तो आपल्या वाटेला जात नाही ,आणि त्याच्याही अतिरेकी वृत्तीला काही प्रमाणात का होईना पण आळा बसतो हे निश्चित !!!

आपला,

(स्वातंत्र्यवादी)  योगेश ...