वृकोदरजी,

आपले पटलेले मुद्दे,

मनुष्याला एखाद्या वनस्पतीशी वा प्राण्याशी भावनिक संबंध जोडता येत असतील तर त्याला ते खाणे नकोसे वाटते. ... ज्या जीवाला खातो तो आपले अन्न कसे मिळवतो हा मुद्दा इथे अप्रस्तुत आहे...तेव्हा वनस्पतीला आकलन नसते हे म्हणणे साफ चूक आहे. प्राण्यांपेक्षा कमी असते म्हणता येईल. ..

पुढील चर्चेयोग्य मुद्दे,

१. वनस्पतींना संवेदना असतात असे वाचल्याचे आठवते.

झाडांना मज्जारज्जू वा तत्सम अवयव नसल्याने झाडांना संवेदना (ज्याला आपण संवेदना म्हणतो, पंचेद्रिये इत्यादी) त्या नाहीत असे वाटते. शिवाय पूर्ण झाडाला स्वतःचा असा मेंदू नसावा. याबाबत जगदीशचंद्र बोसांच्या प्रयोगावर प्रकाश टाकावा ही विनंती.

२. तांत्रिक परिभाषेत, आकलन म्हणजे असेस्मेन्ट, एस्टिमेशन (हिंदी) संदर्भ. त्याला अजुनही आकलन या शब्दाच्या अर्थाबद्दल साशंकता आहे. आकलन म्हणजे आपल्याला नक्की काय अपेक्षित आहे हे जाणून घ्यायचे आहे.

३. आकलन म्हणजे इन्टेलिजन्स/कॉग्नीजन्स अपेक्षित असल्यास यावर चर्चा करता येईल.

प्राण्याची बुद्धिमत्ता इथे व इथे पाहा. इथे वनस्पतींविषयी केलेले भाष्यही लक्ष देण्याजोगे. (मेंदूला धक्का पोहोचल्यानंतरच्या माणसाच्या अवस्थेला 'परसिस्टिव्ह व्हेजिटेटिव्ह स्टेट' म्हणतात.)

प्राण्यांच्या व मानवाच्या बुद्धिमत्तेतील मिलभूत फरक प्राण्यांच्या बाबतीत ही व्याख्या फकत 'आयुष्यादरम्यान, अनुकुलनासाठी वदलणारी वागणूक' असे आहे. यासाठी मुलभूत असणारी हालचाल (अपवाद मिमोस पुडिका इत्यादी) वनस्पती दर्शवत नसल्याने याबद्दल शास्त्रज्ञ साशंक आहेत.

याविषयी अधिक उत्सुकता असल्यास अधिक चर्चा करता येईल.

त्याने केलेले (करू पाहिलेले) विनोद,
लोखंडाचे आकलन. (बुद्धिमान साहित्य हा विनोद नाही)तेव्हा लोखंडाला आकलन नसते हे म्हणणे साफ चूक आहे.

या आधिच्या वाक्यांतून स्पष्ट होणारी त्याची भूमिका,
वनस्पतींच्या 'आकलना'ची याही पेक्षा सरळ व स्पष्ट उदाहरणे (ज्यातील जीन्सचे उदाहरण या वादाच्या निमित्ताने बाहेर तरी आले!)  असताना आपण अशी उदाहरणे घेतल्याचे पाहून हसू आले इतकेच.

मृत वनस्पती हे सगळे करत नाहीत.

मृत वनस्पती काय करतात किंवा जिवंत काय करतात याचा वापर त्या सजीव आहेत हे सांगण्यापुरताच योग्य वाटतो. याचा आकलनाशी संबंध नसावा. जीवंत असताना वनस्पती बऱ्याच क्रिया करतात यावरून त्या सर्वांना आकलन म्हणता येईल असे वाटत नाही. (लोखंडाचा विनोद आपल्याला बराच आवडलेला दिसला)

कळावे, लोभ असावा.