गजल खूप छान आहे. वाचताना रसभंग होत होता. म्हणून माझ्या परीने शुद्धलेखन करून ओळी देत आहे. मला न कळल्यामुळे चुका झाल्या असतील तर सुधारणे.
कोठेतरी कुणाचे अस्प्ष्ट नाव आहे
आजन्म रािहलेला तो खोल घाव आहे.
कोठेतरी कुणाचे अस्पष्ट नाव आहे
आजन्म राहिलेला तो खोल घाव आहे.
तेव्हा मुकाच होतो , आता मुकाच आहे
आता मुकेप्णाचा झाला सराव आहे.
तेव्हा मुकाच होतो, आता मुकाच आहे
आता मुकेपणाचा झाला सराव आहे.
्तेव्हा तुझया प्िरतीने मी िचंब जाह्लेलो
आता धगीत माझे उद्ध्वस्त गाव आहे.
तेव्हा तुझ्या प्रीतीने मी चिंब झालो
आता धगीत माझे उध्वस्त गाव आहे.
मी बोल्लोच नाही माझ्या व्य्था कुणाला
सोसून सरव घेणे माझा स्वभाव आहे.
मी बोललोच नाही माझ्या व्यथा कुणाला
सोसून सर्व घेणे माझा स्वभाव आहे.
जो तो इथे भुकेला जो तो इथे उपाशी
प्रत्येक माणसाला आजन्म हाव आहे.
जो तो इथे भुकेला जो तो इथे उपाशी
प्रत्येक माणसाला आजन्म हाव आहे.
कोठे िमळे िदलासा अन् धीरही कुणाचा
ठावे मला परंतू , सारा बनाव आहे.
कोठे मिळे दिलासा अन् धीरही कुणाचा
ठावे मला परंतू, सारा बनाव आहे.
व्यापार चाललेला आहे इथे िजण्याचा
आयुष्य सोसण्याचा भारीच भाव आहे.
व्यापार चाललेला आहे इथे जिण्याचा
आयुष्य सोसण्याचा भारीच भाव आहे.
न्यायालयामधेही मी हारलोच बाजी
फाशी मला न द्यावी ऍसा ठराव आहे.
न्यायालयामध्येही मी हारलोच बाजी
फाशी मला न द्यावी असा ठराव आहे.
पत्तेच जीवनाचे झाले अखेर माझ्या
अन् िव्स्क्टून गेला प्रत्येक डाव आहे.
पत्तेच जीवनाचे झाले अखेर माझ्या
अन् विस्कटून गेला प्रत्येक डाव आहे.
------------------------------ शतानंद.