तुझ्या त्या निरागस खेळ्या
काही खोडकर काही भाबड्या
का वाटतात तुला तुझ्या चुका
पवित्र प्रेमाची ती साक्षच ग!
तुझ्या बरोबरीचा क्षण अन क्षण
देत असे मज अखंड स्फुरण
समरांगणीच्या उष्ण अंधारामधील
शांत दीपज्योत तूच ग!
मी कृष्ण तू राधा
तुला गोपिकांची काय बाधा
समजतो मी धन्य मजला
ठेवलीस माझी आठवण ग!
आहे मी इथेच अजूनी
राहतो तुझ्या हृदयस्थानी
जाणितो मी सर्व काही
सदैव मी फक्त तुझाच ग!