वरदा,

लेख सुरेख आहे. कोडे अनुत्तरित आहे त्यामुळे भरीव काहीतरी वाच़ल्याच़े समाधान मिळत नाही पण विषयओळख करून देण्याच़ा लेखिकेच़ा हेतू व्यवस्थित साध्य झ़ाला आहे असे वाटते.

आपले गृहीतकच चुकीचे असेल का?

ही मात्र फार धोकादायक गोष्ट आहे.

हे राहून गेलेलं काय असेल? एखादा अदृश्य पदार्थ? असा एखादा पदार्थ ज्याची आपण केवळ कल्पनाच करू शकतो? किंवा अगदी नेमकं सांगायचं तर ज्याची आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही असे 'काहीतरी' ह्या विश्वामध्ये असेल का? पण हे 'काहीतरी' म्हणजे नेमकं काय?

प्रष्ण मार्मिक आहे. आधुनिक विज्ञान अधिकाधिक शोध घेत ज़ाते हे उत्तमच़ आहे पण जितका शोध घेऊ तितके आणखी राहिले आहे असे ज़ाणवत ज़ाते. विज्ञान जेथे थकते तेथे अध्यात्म सुरू होते असे वाटते.

आपला
(नवखा) प्रवासी