"हळूहळू चित्रपट पाहतानाही तेच घडू लागले. " असे म्हटले आहे. यालाच मध्यमा वाणी म्हणायचे का? 

नाही. हा परिणाम चित्रपटात मन न रमण्याचा आहे. लक्ष विचलित होण्याचा हा परिणाम आहे. ह्याचा अर्थ नामस्मरण मध्यमेत चालू आहे असा होत नाही. ते वैखरीतसुद्धा असू शकते. जे चित्रपटातील लक्ष विचलित करण्यासाठी पुरेसे असावे.

 मध्यमेत मनापासून नामस्मरण होणे एवढेच अपेक्षित असते, की आणखीही काही?

नामस्मरण वैखरीत जरी असले तरी ते मनापासूनच व्हायला हवे. मध्यमा ही एक सहज अवस्था आहे. तेथे 'काही करतो' हा भावच नसतो. ते सहज चालू असते.