व्यनितून दिलेली त्याची टिप्पण्णी..

प्रामाणिक मत - मूळकथाच फारशी ग्रेट वाटली नाही. (काही भाग कळला नसणे अशक्य नाही.)

अनुवादबद्दल - १. इराकचा विचार करता साडी खटकली.  
२. "तू कधीच एक चांगला नवरा नव्हतास पण आता तू एक चांगला वडीलही उरला नाहीस." ऐवजी "चांगला नवरा तर कधी नव्हतासच, पण आता चांगला नवराही उरला नाहीस" कसे वाटते? (तरिही भाषांतरीतच वाटते :()
3. कथेत भाभी चालले असते, वहिनी ऐवजी.
४. दुसऱ्या राष्ट्रात ऐवजी परदेशात, (विणकर बोलतोय)
५. जेमिमा इंग्रजीत एकेरीत बोलत असेल पण मराठीत इराकमधील महिला एकेरीत बोलते हे खटकू शकते.
६. ,"आपल्याला जे हवं आहे आणि जे प्रत्यक्षात आपल्याला मिळतं त्यातला फरक मला आता कळला आहे. इथून पुढे मला काहीच नको आहे, जे मिळेल ते स्विकारायला मी तयार आहे आता."  ऐवजी "आपल्याला जे हवं आहे आणि जे प्रत्यक्षात आपल्याला मिळतं त्यातला फरक आता कळला आहे मला. इथून पुढे काही नको, जे मिळेल ते स्विकारायला तयार आहे मी" कसे वाटते?

चित्राबद्दल अभिनंदन, अभिप्राय देण्याआधीच कथा प्रकाशित झाली होती. बदल करायचेच झाले तर करता यावेत म्हणून प्रतिसाद देत नाही, व्यनि पाठवत आहे.