कथा तशी सामान्य आहे. भाषांतराचा प्रयत्न चांगला आहे. पण अनुवाद जमलेला नाही असे वाटते. तसे काही मनोगतींनी व्यनीतून कळविलेही आहे. त्यामुळे त्यावर अधिक काही लिहिण्याची गरज नाही.
'गालिच्याचे कोडे'
गालिचा सोडून जाण्यात नायकाची हतबलता दिसून येते. कथेचे नांव 'शुभ्र गालिचा' असे आहे, अर्थात हा गालिचा कथेतील मुख्य पात्र आहे.
नायक नायिकेत पुढील संवाद घडतोः-
"पांढरा रंग मनाला भावतो माझ्या. तो शांततेचा रंग आहे !"
"शांतता? !!! मग तू हा गालिचा अमेरिकी सैन्याला का भेट देत नाही? या घटकेला पांढरा रंग कोणीच विकत घेऊ इच्छिणार नाही, असं नाही का वाटत तुला?"
नायक कलाकार आहे. संवेदनशील मनाचा आहे. शांतताप्रिय आहे. नायिका म्हणते, या घटकेला पांढरा रंग कोणीच विकत घेऊ इच्छिणार नाही म्हणजेच कोणालाही शांतता नको आहे. ह्या संवादातून जो विषाद दर्शविला आहे तो आणि नायिकेचे पुढील संवादातले मतप्रदर्शन, नायकाचे मतपरिवर्तन होण्यास कारणीभूत ठरते. त्यामुळे स्वप्नांच्या जगात जगण्याचा त्याग करून नायक वास्तवाला स्वीकारतो. पांढऱ्या रंगातील शुभ्र गालिचा नायकाच्या स्वप्नांचे (शांततापूर्ण जगाचे) प्रतीक आहे. (आपले हे स्वप्न पूर्ण होऊ शकणार नाही म्हणून) आपल्या स्वप्नाचा त्याग करून नायक वास्तवाचा स्वीकार करतो हे दर्शविण्यासाठी नायक गालिचा मागे सोडून जातो, असे लेखकाला सुचवायचे असावे.