श्री. सर्वसाक्षी,

सर्वच किस्से सुंदर आहेत. मजा आली.

एकदा एक पोलीस निरिक्षक गाण्याच्या कार्यक्रमाला गेला होता. व्यासपिठावर गायिका गात होती, 'चाफा बोलेना...... चाफा खंत करी काही केल्या बोलेना...आऽऽऽऽ चाफा बोलेनाऽऽऽऽ'

हे महाशय पहिल्या रांगेतच बसले होते. भयंकर अस्वस्थ झाले. एकदम उठून उभे राहिले आणि खड्या आवाजात म्हणाले,'चांगला, कानाखाली जाळ काढा कसा बोलत न्हाई बगतोच..'