वेद्श्रीजी,

मुरुडशेंग ही करंजीच्या पात्रात करत नाहीत. तिला हाताने मुरड घालतात. हिला मोदकांची बहीण असे म्हणतात. म्हणून मोदकांबरोबर करंजी ही हवीच.

तसेच मोदक झाल्यानंतर उरलेली उकड कडबोळ्यांसारखी करून उकडूनही छान लागते. माझी आजी आम्हा मुलांसाठी अशी चाळणीभरुन कडबोळी करत असे. आणि आम्ही मुले ५ मिनिटांत त्याचा फडशा पाडत असू. माझी आई अजूनही माझ्यासाठी अशी कडबोळी करते.

साक्षी