उकडीचे मोदक हे अगदी सहज उपलब्ध होणार्या जिन्नसांपासून (तांदूळ, गूळ, नारळ आणि पाणी) तयार करता येऊ शकणारे पण इतर कुठल्याही पक्वांन्नापेक्षा कितीतरी पट अधिक चविष्ट असे आहे यात शंकाच नाही.
पण, मोदकांबरोबरच तयार होणारे आणखी एक उप-पक्वान्न म्हणजे निवगरी हे होय. आमच्या कोकणात मोदकांबरोबर निवगर्यांचा बेत हा ठरलेलाच असतो.
निवगरी, मोदकसाठी तयार केलेल्या उकडीमधे ताक, हिरवी मिरची आणि जिरे घालून तयार करतात.
ही निवगरी मोदकांच्या (कमीत कमी) दोन हप्त्यांमधे रूचीपालटीसाठी अत्यंत चांगली असते.