वावा! छान लेख आहे. बैठकीच्या खोलीपासून झोपण्याच्या खोलीपर्यंतचा प्रवास, कपाट, आंघोळहौद, वाघभूत, ड्रॅक्युला-पंथ सही आहे.
पौर्णिमेच्या रात्री लांडगा बनणारा माणूस (वेअरवुल्फ), ॐ, त्रिशूळ किंवा क्रॉस ला घाबरणारी भुते देखील चित्रपटातून पाहिली. "किले का रहस्य" पाहताना (?) भीती वाटायची हे खरे आहे. विशेषतः त्याचे टायटल साँग भयानक वाटायचे. पद्मिनी कोल्हापुरेने बालकलाकार म्हणून काम केलेला एक भयानक चित्रपटही दूरदर्शनवर पाहिल्याचे आठवते. "झी कॉमेडी शो" आणि रामसे बंधूंच्या विनोदी चित्रपटांनी चांगलीच करमणूक केली.
पण सायलेन्स ऑफ द लँब्स भाग १, भाग२ आणि रेड ड्रॅगन सारखे चित्रपट खऱ्या भुतांशिवायही भयानक वाटले.