वा 'तो',
उत्कृष्ट सहज-सोपं विश्लेषण! आणखी येऊ देत. सापेक्षतेवर पूर्वी वाचलं होतं. तेव्हा सगळं कळलं होतं असं म्हणत नाही; पण तुमचा हा लेख आत्तापर्यंत तरी समजला.
'ब्रीफ़ हिस्टरी ऑफ़ टाइम' मधे 'हॉकिंग'नं म्हटलंय की कुणीतरी त्याला म्हटलं की समीकरणं लिहिली, तर क्लिष्टता येईल; म्हणून संपूर्ण पुस्तकात त्यानं ऊर्जा = वस्तुमान x प्रकाशगतीx प्रकाशगती
हे एकच समीकरण वापरलं.
मी हे अशासाठी म्हटलं की कित्येकदा सहजसुंदर विवेचनाबरोबरच समीकरणांचा आधार घेतला तरी सोपेपणा येऊ शकतो असं मला वाटतं. तुम्हांला वाटला, तर जरूर वापर करावा. प्रा. भा.रा. बापटांच्या आईनस्टाईनवरच्या पुस्तकात (राजहंस प्रकाशन) अशा रीतीनं सापेक्षता सांगितली आहे.
- कुमार