गार्गी व श्री.भोमे,
प्रतिसादांबद्दल धन्यवाद -
गेला आठवडा मुंबईबाहेर असल्याकारणाने श्री.भोमेंचा प्रतिसाद वाचण्यास उशीर झाला.
फिरोज व राज ही अमराठी नांवे घेण्याचे कारण म्हणजे त्यांच्या नामोच्चारात साधर्म्य आहे व वासंतीच्या वडिलांना कदाचित त्याच्या अमराठी असण्यावरच हरकत असावी - मुंबईतले पारशी सुंदर मराठी बोलतात व अगदी बारकाईने लक्ष न दिल्यास ते अमराठी आहेत हे कळतच नाही.
जाता जाता- डॉ. फिरोज खंबाटा हा माझा एक क्लायंट व मित्र पुणे व मुंबई रेसकोर्सवर  'ऍक्वाईन डॉक्टर' आहे त्यावरून मला हे नांव सुचले !