प्रवासी,
गज़लेचा पारंपरिक एकच विषय -आशिक-माशुक,साकी-जाम,प्रेम-प्रेमभंग- असायचा.पण विसाव्या शतकात दोन नवीन प्रकारच्या गज़ला लिहिल्या जाऊ लागल्या- १) तरक्कीपसंद(आजच्या परिभाषेत पुरोगामी)गज़ल आणि २)जदीद(नवीन) गज़ल.गज़लेच्या ठराविक विषयांच्या कक्षा ओलांडून ज्यास तुम्ही निषिद्ध, विद्रोही, इत्यादी मानता ते विषयही हाताळले जाऊ लागले.ह्या बाबतीत कदाचित सुभाषचंद्र अधिक अधिकारवाणीने सांगू शकतील.
छंदरचना तुमच्या पसंतीस उतरली हे वाचून समाधान झालं.
आपला (रुंदावलेल्या कक्षांत स्वच्छंद विहार करु इच्छिणारा)
मिलिंद