सर्वसाक्षी, अत्यंत सुंदर लेख लिहिला आहे तुम्ही. माझ्यासह माझ्या सर्व कुटुंबियांतर्फे या हुतात्म्यांना भावपूर्ण आदरांजली. खरे थोर लोक बरेचदा प्रसिद्धीविन्मुखच रहातात, ही गोष्ट परत एकदा जाणवली.

'फितुरीने घात केला' शब्द अक्षरशः डोक्यात गेले माझ्या जसे ते इतिहास वाचताना नेहमीच जातात. जेव्हाही कधी आपला इतिहास वाचायला घेते तेव्हा हीच गोष्ट तीव्र संताप निर्माण करून डागण्या देणारी ठरते मला. आपलेच दात आणि आपलेच ओठ म्हणायची वेळ असताना शत्रूंना नावं ठेवणार तरी कुठल्या तोंडाने. शत्रू तरी परवडला कारण तो किमान शत्रू तरी असतो पण आपले जेव्हा काळजात कट्यार खुपसतात तेव्हा होणाऱ्या त्या वेदना खूप वेगळ्या प्रकारच्या असतात. हे केवळ इतिहासातच झाले आहे अशातला भाग नाही, आजही हाच खेळ चालू आहे याचा जबरदस्त विषाद वाटतो. अशा फितुरांना तर बिनपाण्याच्या ठिकाणी नेऊन कापलं पाहिजे.