खाकरा मी कधी बनवला नाही ( खाल्ला उदंड असला तरी :D ) त्यामुळे खाकरा बनवायची पद्धत आधी मला समजावून घ्यावी लागेल आणि मग ती तुम्हाला सांगता येईल. खाकऱ्याची पाककृती लवकरात लवकर देण्याचा जरूर प्रयत्न करेन.

तुमचं 'अनिकेतसमुद्र' हेच दर्शनी नाव छान होतं, असं माझं मत आहे. झालेल्या चुकांमधून धडा घ्यायचा प्रयत्न करून पुढे जायचं असतं, कायमची अढी मनात ठेवून आपल्याला स्वतःला काहीच मिळत नाही, असा माझा व्यक्तिगत अनुभव आहे. असो. 'अनिकेतसमुद्र'चं छान छान अनुभवकथन वाचायला मी नेहमीच उत्सुक असेन. कळावे.