तसेच, "खळबळ" ही "अनागोंदी" ची सौम्य आवृत्ती असावी.

माझी कल्पना याउलट 'अनागोंदी' सौम्य तर 'खळबळ' तीव्र अशी होती. असो.

'अनागोंदी'मध्ये फक्त 'कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही', 'या हाताचा त्या हाताला पत्ता नाही' वगैरे 'मिसमॅनेजमेंट' छाप प्रकार होतात; 'टर्मॉईल' मध्ये कट-कारस्थाने, संप, खून-मारामाऱ्या-बलात्कार, कायदा-सुव्यवस्था ढासळणे, वगैरे बऱ्याच गोष्टी अभिप्रेत असाव्यात असे वाटते. अर्थात 'अनागोंदी' ही 'टर्मॉईल'ची पहिली पायरी, आणि म्हणूनच अधिक सौम्य आवृत्ती, असे वाटते. असो.

- टग्या