जमले रे तुझे गाणे जमले रे
गोडीने, शब्दांच्या, शब्दांच्या गोडीने, सजले हे विडंबन सजले रे

सकाळी सकाळी, वाचून आमचा दिवस झकास हो
तुमच्या शब्दांनी विनोदी झाला की आजचा प्रवास हो
या शब्दांनी, या शब्दांनी, सुगंधी आनंदी वारे
गोडीने, शब्दांच्या, शब्दांच्या गोडीने, जिंकले तू मन माझे जिंकले रे
जमले रे तुझे गाणे जमले रे

(प्रतिविनोदी) तुषार