श्री. ओक यांच्याबद्दल माहिती इथे उपलब्ध आहे.
सध्या तिथे उभी असलेली वास्तू कुठल्या ही दृष्टीने हिंदू मंदीरासारखी वाटते नाही. यापेक्षा अधिक देखणे शिवमंदीर तेथे होते म्हणण्याला अर्थ नाही.
(शहाजहानचे मुमताजचे प्रेम. प्रेमाची निशाणी वगैरेला तो दुर्दैवाने फारसे महत्व देत नाही. त्या मुळे ओकांच्या म्हणण्यातली मुमताजची दुसरी कबर असणे अशक्य नाही.)
थोडक्यात अशा अनेक 'कॉन्स्पिरसी थिअरीज' आहेत. ज्याला मोजके 'तज्ञ' सोडल्यास इतरांची मान्यता नाही.
बाकी दिल्लीतली 'जामा मशिद' देखिल हिंदू मंदिर आहे वाचून करमणूक झाली. रोम हा राम होता, लग्ज़ेंबर्ग लक्ष्मण वरून आले याबद्दल आपण वाचले आहे का?
हे भारतीय मुसलमानही मूळचे भारतीय हिंदूच आहेत हे आपण विसरत तर नाही आहोत?
वसुधैव कुटुंबकम् म्हटल्यावर हे सारे आलेच! नाही का?
ताजमहाल तेजोमहाल/तेजोमहालय असला काय किंवा नसला काय त्याचे जे महात्म्य आहे ते पर्शियन, मुस्लिम, हिंदू वास्तुकले मुळे, त्या मुळे या आधी तेथे मंदीर होते वा नव्हते, ही समाधी आहे की थडगे.. याच्याशी काय देणे घेणे? ती वास्तुकलेचा एक अप्रतिम नमुना आहे इतकेच!