आपल्या परखड मताशी काही अंशी सहमत आहे.

पण...

नुसत्या नाम-नाद साधर्म्यावरून "रोम" आणि "राम" एकच म्हणणे आणि एखाद्या अस्तित्वातल्या इमारतीतले पुरावे सचित्र दाखवणे यात खूप फरक आहे असे वाटते.

त्याही पुढे, एखाद्या त्रयस्थ (नॅप) व्यक्तीने केलेले संशोधन एकदम ठार चूक आहे असे मानणे योग्य आहे का हे तितक्याच परखडतेने तपासून पाहावे असे वाटते. सदर संशोधकांनी काढलेली छायाचित्रे घेऊन प्रस्तुत वास्तूचे आपण सखोल निरीक्षण करावे असेही वाटते.