महोदय,
१. शिवधर्माची तत्त्वे काय आहेत ?
२. ज्या जिजाउंचा तुम्ही उल्लेख करताय ( वापर करताय, हे जास्त संयुक्तिक ठरेल) त्यांनीही राम-कृष्ण यांच्या गोष्टी सांगूनच शिवाजीला मोठे केले. राम-कृष्ण हे हिंदू धर्मात "देव" मानले जातात, याचा आपणास कल्पना आहे का ?
३. ज्या अन्यायाविषयी तुम्ही बोलत आहात, तो अन्याय नवीन धर्म स्थापल्याने नाहीसा होईल का ? मग बौद्ध धर्मात प्रवेश केल्याने अन्याय का नाही थांबला ?
४. हा धर्म केवळ जातीय तेढ वाढवण्यासाठी केलेला नाहीये, हे तुम्ही स्पष्ट करू शकता का ?
५. आरक्षणांबाबत या धर्माची भुमिका काय आहे ? आरक्षण हळूहळू नष्ट करण्यास किंवा त्याची आर्थिक स्तरावर पुनर्मांडणी करण्यास हा धर्म उत्तेजन देतो काय ? ( किंवा, या नवीन धर्मात प्रवेश केलेल्या बहुजन समाजाच्या लोकांनी आरक्षणाचे लाभ घ्यावेत की नाही? तुमचा धर्म काय सांगतो?)
६. बहुजन समाजात जो आळशीपणा , ऐतखोरपणा साचलेला आहे, त्याचे निवारण हा धर्म कसा करणार आहे?
७. राष्ट्रिय संपत्ती, राष्ट्रभावना, यांना हा धर्म कितपत महत्त्व देतो ? देत असल्यास, पुण्यातला भांडारकर संस्थेची मोडतोड केल्याबद्दल या धर्माचे संस्थापक जाहीर माफी मागतील का ?
सध्या इतक्या प्रश्नांची उत्तरे द्या. ती समाधानकारक असतील तर तुम्ही उल्लेखलेल्या विचारवंतांचे साहित्यही वाचू. अगदीच महत्त्वाचे आणि युगप्रवर्तक विचारधन असल्यास, आम्ही स्वतः तुमच्या शिव धर्मात प्रवेश करू. अर्थात, माझा शिवधर्म प्रवेश, तुमचा धर्म विटाळणार नसेल तर !
काय आहे, तुमचा धर्म जरी वाढला आणि फोफावला ( शक्यता मला कमीच दिसते.) तरी कालचक्राची चाके फक्त उलटी होतील. समाजाची अवस्था आणि व्यवस्था बदलणार नाही. काल वेगळे शोषक आणि शोषित होते, उद्या वेगळे असतील. पण समाजात शोषक आणि शोषित हे वर्ग आणि त्यांच्यातली तेढ कायमच राहिल !
अजुन एक,
युगायुगांपसून चालत आलेल्या ब्राम्हणी वर्चस्वापसून मुक्तीसाठी बहुजन समाज आता जागा झाला आहे.
म्हणजे आंबेडकर/फुले तुम्हाला पुरले नाहीत. हे नवीन विचारवंत कसे आणि का वेगळे आहेत, हेही जमल्यास स्पष्ट करा.
धन्यवाद !